नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या झील महाविद्यालया दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आंतरराज्य अभ्यास दौरा आयोजित केला होता.
त्या मध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, चार दिवसीय अभ्यास दौऱ्या दरम्यान प्रसिद्ध मिनरल वॉटर प्लॅन्ट बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला भेट दिली. ज्यात पूर्ण उत्पादन प्रक्रिया समजून घेतली तसेच मार्केटिंग करण्याची पद्धत यावर सविस्तर चर्चासत्रा कंपनी ने घेतले. बिसलेरी व्यवसायची सुरवात तसेच नवीन सर्व उत्पादन याची माहिती घेतली.
या नंतर, रामोजी फिल्म सिटी चा एक दिवस दौरा करण्यात आला ज्यात तेथील व्यवस्थापन सविस्तर पाहण्यात आले.
हैद्राबाद ला प्रसिद्ध असणाऱ्या एनटीआर गार्डन ला सुद्धा यात भेट दिली गेली.
वरील भेटीसाठी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ.ऋषिकेश काकांडीकर, डॉ.योगेंद्रकुमार देवकर व प्रा.सचिन वाडेकर समन्वयक म्हणून काम पाहिले.
संस्थेचे प्राचार्य डॉ.अजित काटे यांनी शुभेच्छा दिल्या, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांदवे व सचिव श्री. जयेश काटकर यांच्या मार्गदर्शना खाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
– राज देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग