विश्रांतवाडी, दि. 2 (प्रतिनिधी) – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व पुणे महापालिका लुंबिनी उद्यान साहित्यिक कट्टयाच्या वतीने संयुक्तपणे गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व निमंत्रित कवीचे कवी संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
येरवडा येथील लुंबिनी उद्यानात येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी 10 वी व 12 वीतील 250 गुणवंत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवांतर्गत “हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधून तिरंगा झेंडा व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी मसापचे कार्यवाह गझलकार दीपक करंदीकर होते. याप्रसंगी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्राचार्या प्रा. वृषाली रणधीर, क्रांती शितोळे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, अशोक कांबळे, उदय कर्णे, सहायक आयुक्त वैभव कडलक उपस्थित होते.
कवी संमेलनात कवी रमेश जाधव, अलका जोशी, राहुल भोसले, आशा कांबळे, लक्ष्मी रेड्डी, बाळकृष्ण बाचल, किरण जोशी कवींनी देशभक्तीपर रचना सादर केल्या. या प्रसंगी पुणे महापालिकेचे कर्मचारी स्वप्निल कुठवळ, निसार शेख, सतीश कांबळे यांना डॉ. धेंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले. तसेच लुंबिनी उद्यान साहित्यिक कट्टयाचे समन्व्यक प्रा. रुपाली अवचरे, रमेश जाधव, विजय कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय लोंढे यांनी केले होते.