वडगाव निंबाळकर येथील हनान पठाण यांनी निर्माण केला आदर्श: सर्व स्तरातून कौतुक
वाघळवाडी -जिद्द, चिकाटीला अभ्यासाची जोड देत ऍड. हनान युसुफ पठाण हे न्यायाधीश झाले आहे. वडगाव निंबाळकराच्या सुपुत्राने गावाचे उज्वल केले असल्याची कौतुकाची थाप सर्वस्तरातून त्यांच्यावर पडत आहे.
ऍड. पठाण यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सोमेश्वर येथे सोमेश्वर पब्लिक स्कूल, सोमेश्वरनगर येथे तर माध्यमिक शिक्षण स्वातंत्र्य विद्या मंदिर, वडगाव निबाळकर येथे पूर्ण केले. तसेच बीकॉमपर्यंत शिक्षण हे बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथून पूर्ण केलेले आहे.पठाण यांनी बारामती येथील वसंतराव पवार विधी महाविद्यालय, बारामती येथून 2013 मध्ये एलएलबीची पदवी संपादन करीत बारामती येथील अतिरिक्ज्जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करण्यास सुरूवात केली.
प्रॅक्ट्रीस करतानाच त्यांनी 2015 मध्ये वसंतराव पवार विधी महाविद्यालयातून एलएलएमची पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर 2019 मध्ये झालेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होत न्यायाधीश हे मानाची पदवी पटकावली. दरम्यान, या परीक्षेला जवळपास 15 हजार परिक्षार्थी बसलेले होत. त्या परिक्षार्थीमधून पठाण हे महाराष्ट्रामध्ये 158 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद निवड झालेली आहे.
हनान पठाण याचे वडील वडील शेतकरी असून आई गृहिणी आहेत. तर एक भाऊ असून ते शिक्षक असून एक विवाहित बहीण आहे. कुटुंबासह मित्र परिवार, शिक्षक वर्ग, नातेवाईक यांच्या प्रत्साहानामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो असे ते अभिमानाने सांगतात. दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द आणि चिकाटाच्या जोरावर न्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकतो हे पठाण यांनी सिद्ध करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासाने यश संपादन करू शकलो. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर कायम ठेवत. जिद्द व चिकाटीने परीक्षेची तयारी केल्याने हे यश संपादन करू शकलो.
– हनान पठाण, न्यायाधीश