स्टुअर्ट ब्रॉडचे पाचशे बळी पूर्ण

मॅंचेस्टर – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेटला बाद करत आपला पाचशेवा कसोटी बळी मिळवला. मात्र, त्यातही एक अनोखा योगायोग होता. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने यापूर्वीच पाचशे बळींचा टप्पा पार केला आहे. मात्र, योगायोग असा की त्यानेही पाचशेवा बळी नोंदवताना ब्रेथवेटलाच बाद केले होते. पाचशे कसोटी बळी घेणारा ब्रॉड हा अँडरसननंतरचा इंग्लंडचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. 

या सामन्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात ब्रॉडने 6 गडी बाद केले व पाचशेचा जादुई आकडा गाठण्यात मोठी मजल मारली. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू झाल्यावरही ब्रॉडला हा आकडा गाठण्यासाठी तीन बळींची गरज होती. या डावात ब्रॉडने दोन गडी बाद केले तेव्हा त्याच्या बळींचा आकडा 499 वर पोहोचला.

सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला बाद करत ब्रॉडने पाचशेवा बळी घेत विक्रमाला गवसणी घातली. ही मालिका आयसीसीच्या कसोटी विजेतेपद स्पर्धेतील असून त्यात 50 बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.