चाेरटे ‘अनलाॅक’; व्यावसायिकाच्या घरातून 21 लाखांचा ऐवज लंपास

38 तोळे सोने, पाच किलो चांदीसह तीन लाख रु. चोरले

पुणे- वाकडेवाडीत एका व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले. येथून त्यांनी 38 तोळे सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी व तीन लाखांची रोकड असा तब्बल 21 लाख 20 हजारांचा किमती ऐवज चोरून नेला. 

 

ही घटना 15-ए भाले इस्टेट, गारवे होंडा शोरुमच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी प्रशांत मनोहर आभिनभावी (वय 50) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आभिनभावी हे काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. त्यामुळे सोमवारपासून त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदी व रोकड असा 21 लाखांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज चोरला.

 

अभिनभावी जेव्हा घरी परतले, तेव्हा चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे निरीक्षक पठाण यांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. तपास पोलीस निरीक्षक पठाण करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.