लंडन – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक ऍशेस कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात अष्टपैलू बेन स्टोक्स परतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. स्टोक्सने काही महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.
मात्र, आता तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज बनला असून त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतरच त्याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान ऍशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
इंग्लंडचा संघ – ज्यो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, डॉमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउली, हसीब हमीद, डॅनियल लॉरेंस, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.