Stock Market Updates: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बँक शेअरच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. बड्या सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारातील ही वाढ झाली. त्यामुळे BSE सेन्सेक्स 167 अंकांच्या उसळीसह 71,595 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64 अंकांच्या उसळीसह 21,782 अंकांवर बंद झाला. याआधी गुरुवारी सेन्सेक्स723 अंकांनी घसरला होता आणि 71,428 च्या पातळीवर बंद झाला होता.
आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बँक निफ्टी 622 अंकांच्या उसळीसह 45,634 अंकांवर बंद झाला. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर ऑटो, आयटी, तेल आणि वायू, धातू, ऊर्जा, मीडिया आणि रिअल इस्टेट घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 वाढीसह आणि 14 घसरणीसह बंद झाले, तर 50 निफ्टी शेअर्सपैकी 27 शेअर्स हिरव्या रंगात आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
आजच्या व्यवहारात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी PSE निर्देशांक 2.66 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. रेल्वे, संरक्षण, उर्जा आणि उर्जेशी संबंधित कंपन्यांसह लहान आणि मध्यम सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
बाजार मूल्यात घट –
शेअर बाजार उच्च पातळीवर बंद झाला असला तरी सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 386.43 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 388.72 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात बाजारमूल्यात 2.29 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
आजच्या व्यवहारात वाढलेले आणि घटलेले शेअर्स –