IND vs ENG Test Series, Ishaan Kishan : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनच्या अडचणी वाढत आहेत. माजी भारतीय सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही इशान किशनवर निशाणा साधला आहे.
इशान किशन टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत गंभीर असेल तर त्याने रणजी ट्रॉफी खेळायला हवी होती, असे आकाश चोप्रानं मत व्यक्त केलं आहे. इशान किशन रणजी ट्रॉफी खेळून आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करेल आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण इशान किशन रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडकडून एकही सामना खेळला नाही.
वास्तविक, इशान किशनसाठी अडचणींचा काळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सुरू झाला. किशनने मानसिक आरोग्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक घेतला. यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी किशनची निवड झाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही किशनला स्थान मिळाले नाही, तेव्हा त्याला बाहेर ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले.
याला उत्तर देताना टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, जर इशान किशनला पुनरागमन करायचे असेल तर त्याला कसले तरी क्रिकेट खेळावे लागेल. पण किशनने रणजी ट्रॉफीच्या एकाही सामन्यात भाग घेतला नाही.
IND Vs ENG 3rd Test : जसप्रीत बुमराहला मिळणार ब्रेक, संघात ‘या’ खेळाडूला मिळणार संधी….
परतीचा मार्ग यामुळे बंद…
आकाश चोप्राने द्रविडचे समर्थन करत म्हटले की, “राहुल जे बोलले ते बरोबर आहे. राहुल द्रविड म्हणाला की, “आधी त्याने स्वत:ला उपलब्ध करून द्यावे, कुठले तरी क्रिकेट खेळावे. क्रिकेट खेळत नसलेल्या व्यक्तीला टीम इंडियासाठी कसे निवडायचे? हे मान्य करता येणार नाही. यावेळी रणजी करंडक स्पर्धा सुरू आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट होत आहे. तिथे खेळले पाहिजे. जर तुम्ही कोणाशीही बोलला नाही किंवा तुम्ही उपलब्ध असल्याचे कोणालाही सांगितले नाही, तर तुमचे पुनरागमन कसं होऊ शकते.”