Stock Market Opening : काल केंद्र सरकारचा अंतरिम बजेट सादर झाला. त्यानंतर आज शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या काही मिनिटांतच BSE सेन्सेक्सने ७२ हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीने 21873 ची पातळी ओलांडली आहे. बँक निफ्टीने 427.25 अंकांची किंवा 0.93 टक्क्यांची उसळी घेत 46,615 चा स्तर गाठला आहे.
मार्केट ओपनिंग कसे होते?
BSE सेन्सेक्स आज 332.27 अंकांच्या किंवा 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 71,977 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 115.30 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 21,812.75 वर उघडला आणि 21800 चा टप्पा पार केला.
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी फक्त मारुतीचा शेअर लाल रंगात आहे आणि उर्वरित 29 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. सर्वाधिक लाभधारकांमध्ये, पॉवर ग्रिड 2.99 टक्के आणि इन्फोसिस 2.03 टक्के वाढले.
रिलायन्स इंडस्ट्रीज 1.85 टक्के आणि टीसीएस 1.73 टक्क्यांनी वर आहे. ICICI बँक 1.74 टक्क्यांच्या वाढीसह आणि टाटा स्टील 1.67 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
निफ्टी शेअर्सची स्थिती
निफ्टी शेअर्सचे चित्र पाहिल्यास, त्यातील 50 पैकी 45 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 5 शेअर्स घसरत आहेत. 50 पैकी जे पाच समभाग घसरत आहेत त्यापैकी आयशर मोटर्स 2 टक्क्यांनी आणि मारुतीचा शेअर 0.88 टक्क्यांनी घसरला आहे.
HDFC लाइफ 0.44 टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये अदानी पोर्ट्स 5.21 टक्के, बीपीसीएल 4.15 टक्के आणि पॉवर ग्रिड 2.86 टक्क्यांनी वर आहेत. Hero MotoCorp 2.67 टक्के आणि Infosys 2.24 टक्क्यांनी वाढून मजबूत स्थितीत दिसत आहे.