हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
घाबरून जाण्याची गरज नाही मी सदैव तुमच्यासोबत – पूजा पारगे
खडकवासला – सायबर क्राइमचे प्रमाण सध्या सर्वत्र वाढत आहे, फोन हॅकिंगच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहे. काल खानापूर (ता. हवेली) गावात राजनंदिनी ग्राम संघ महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणार्या पूजा देशमुख यांचा मोबाईल हॅक झाला. त्याचबरोबर सुजाता जावळकर, सुप्रिया तारू, पायल कुंदेकर इत्यादी महिलांना या हॅकिंगच्या माध्यमातून गुन्हेगाराने फोनमध्ये सेव्ह असलेल्या महिलांना फोन करून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी चौकशी व्हावी व आरोपीस पकडून त्याला योग्य ती शिक्षा व्हावी यासाठी काल महिला बालकल्याण समिती माजी सभापती पुजा नवनाथ पारगे यांनी रात्री 10.30 वाजता या महिला भगिनीला न्याय देण्यासाठी हवेली पोलीस स्टेशन येथे प्रकरणाचे रीतसर तक्रार दाखल केली आहे. याप्रसंगी खानापूर गावच्या ग्रामपंचायत सदस्या तेजश्री जावळकर, पूजा देशमुख, दीक्षा पारगे, पूनम चव्हाण, बचत गट अध्यक्ष सामुदाय संसाधन व्यक्ती ( सीआरपी ) खानापूर शालन जावळकर, संघदीप शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
कॉल आल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची माहिती त्या संबंधित व्यक्तीला देऊ नये. शिवीगाळ किंवा पैशांची मागणी केली तर संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे सर्व बचत गटातर्फे आभार.
-रुचिका युवराज वाघ, प्रभाग समन्वयक
यापुढे महिलांची फसवणूक होणार नाही यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. महिलांनी कोणत्याही ओळख नसणार्या महिलेला व पुरुषाला कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये.
-शालन तानाजी जावळकर, सीआरपी खानापूर