पिंपरी- अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री शिवतेजनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.
विजयकुमान ज्ञानदेव पाटील (वय 47, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 6) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील यांनी आपली 12 हजार रुपये किंमतीची (एमएच 14 क्यू 9806) ही दुचाकी शिवतेजनगर, चिंचवड येथे रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पार्क केली होती. अवघ्या अर्धा तासांत चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.