मुंबई – डिसेंबर 23 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 691 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 562 अब्ज डॉलर इतका झाला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 571 दशलक्ष डॉलरने कमी झाला होता.
ऑक्टोबर 2021 मध्ये भारताकडील परकीय चलन साठा तब्बल 645 अब्ज डॉलरवर गेला होता. त्यानंतर जागतिक परिस्थिती नकारात्मक झाली. शिवाय रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्याचबरोबर व्याजदर वाढविण्यात येत असल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. त्यामुळे भारतीय कडील परकीय चलन साठ्याच्या मूल्यांत वेगाने घट होत असल्याचे सांगण्यात येते.