Gudi Padwa 2021 | गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; ‘हे’ आहेत नियम

मुंबई – राज्यात दररोज नवीन करोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली असून अनेक ठिकाणी करोना रुग्णांसाठी बेड्स, व्हेंटीलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. लोक एकत्र आले तर करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा असे राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केलीय.

सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास मनाई असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.