लसीचा प्रभाव वाढण्यासाठी चीनची नवी योजना

बीजिंग – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी चीनने तयार केलेली लस परिणामकारक नसल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक दिवसांपासून सुरु होती. आता अखेरीस चीननेच त्या देशाच्या लशीची परिणामकारकता प्रभावी नसल्याचे मान्य केले आहे. 

चीनसारख्या देशाकडून अशी कबुली दिली जाणे दुर्मिळ असले तरी चीनमधील लसीकरणासंदर्भातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीचा प्रभाव कमी असल्याचे मान्य करून प्रभाव वाढवण्यासाठी दोन वेगळ्या लसींचे मिश्रण करण्याचा विचार चालू असल्याचे म्हटले आहे.

चीनने तयार केलेल्या लसीमध्ये करोनाला प्रतिबंध करण्याची उच्च क्षमता नसल्याचे चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू यांनी शनिवारी एका परिषदेत सांगितले आहे चीनच्या नैऋत्येकडील शेंगडू शहरात ही परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

लसीच्या प्रभावीपणाबद्दलच्या शंका दूर करण्यासाठी चीनने या या लसीचे कित्येक कोटी डोस परदेशात निर्यात केले आहेत. आधीच्या प्रायोगिक मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए प्रक्रियेतून फायझर-बायोएनटेक कंपनीने ही लस तयार केली आहे.

आता लसीकरणासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे बनवलेली वेगळी लस वापरावी का, याविषयी अनौपचारिक चर्चा सुरु असल्याचे गाओ यांनी म्हटले आहे. चीनच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठांची रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी गाओ यांच्यासंदर्भातील प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

आता एमआरएनए आधारीत लस विकसित करण्यासाठी काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. ही लस चाचणीच्या टप्प्यावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लसीचा प्रत्यक्ष वापर कधीपासून सुरु होणार याची कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नसल्याचे वांग हुआकिंग यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.