मंचर -येथील घोडेगाव रस्त्यावरील आठवडे बाजार सुरू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी जितेंद्र डुडी आणि तहसीलदार रमा जोशी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती वसंत बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, मंचर येथे दर रविवारी मोठा आठवडे बाजार भरत असतो. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार सुरू झाले असल्याने मंचर येथील आठवडे बाजार सुरू करण्याबाबत शेतकरी, व्यापारी आणि स्थानिकांकडून मागणी होत आहे.
यासंदर्भात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांची भेट घेतली असून कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे.