रांजणगाव गणपती -करोनाच्या पार्श्वभूमीवर मलठण व पाबळ (ता. शिरूर) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे.
राज्यात करोना संसर्ग झालेले रुग्ण वाढत आहे, त्यामुळे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 17) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (ता. आंबेगाव) येथे प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत त्यांनी आदेश दिले.
या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सभापती संजय गवारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंबेगाव शिरुरचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, आंबेगावचे प्रांत जितेंद्र डुडी, शिरूरचे प्रांत संतोष कुमार देशमुख, उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिरुरचे गटविकास अधिकारी शिरूर भाऊसाहेब ढवळे, प्रमोद पऱ्हाड, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. त्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी मलठण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.