मराठा महासंघाची शासनाकडे मागणी
शिरूर (पुणे)-शिरुर शहर व पंचक्रोशीतील कोविडचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करावी. इतर आजाराने ग्रस्त असेलल्यांसाठी जनता क्लिनिक सुरू करावे, अशी मागणी अखिल मराठा महासंघ शिरूरचा वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन महासंघाचा वतीने शिरुर तहसील कार्यालय याना देण्यात आले. नायब तहसीलदार यादव यांनी ते स्वीकारले. मराठा महासंघाचे संभाजी कर्डिले, वर्षा काळे, संजय बारवकर, योगेश महाजन, गणेश जामदार, ऍड. सागर गायकवाड, प्रा. विलास आंबेकर, प्रा. सतीश धुमाळ, अनिल दिवटे, रमेश दसगुडे आदीनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, खासगी हॉस्पिटलमधून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे; परंतु सामान्य नागरिकांना त्यांचे बील परवडणारे नाही. करोना व्यतिरिक्त अन्य आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकिय सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी जनता क्लिनिक सुरू करावे. जेणे करुन कोरोना व्यतिरिक्त अन्य आजाराने त्रस्त असणाऱ्यांवर उपचार होतील.