नगर – अलीकडे खासगी बस कंपन्यांनी वाहतूक क्षेत्रात कमालीची आगेकूच केल्यामुळे महामंडळच्या बसचे उत्पन्न घटले. त्यामुळे एसटी महांडळ उत्पन्न वाढीसाठी लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहली करीता प्रासंगिक करारावर एसटी महामंडळ भर देणार आहे. त्याअंतर्गत विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याकरीता लवकरच आगारनिहाय प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट ठरवून दिले जाणार आहे.
सदर योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्रशासनास आपल्या स्थरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एस टी महामंडळाने दिलेत. गेल्या वर्षांमध्ये विभागीय स्तरावर असे प्रासंगिक करार करणे कमी झाल्याने, एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावर गेल्या वर्षात ज्या शैक्षणिक संस्थांनी प्रासंगिक करार केला होता. अशा शैक्षणिक संस्थांना भेटून एसटी पुन्हा प्रासंगिक करार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशा संस्थांशी एसटीचे अधिकारी भेटून शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. शिवाय ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एस टी महामंडळाची बस न घेता खाजगी बसेस वापरल्या अशा संस्थांशी भेटून महामंडळाचा बसेस घेण्याबाबत त्यांना विनंती करावी, विभागीय स्तरावर प्रत्येक आगरासाठी आवश्यकते प्रमाणे स्वतंत्र दर मंजूर करावेत. कोणत्याही कारणास्तव प्रासंगिक करारावर बसची मागणी नाकारू नये आशा सूचना राज्य परिवहन महा मंडळाने संबंधित अधिनस्त यंत्रणांना दिल्या आहेत.
प्रासंगिक करार म्हणजे काय?
पूर्वी धार्मिक कार्यक्रम, सहली, लग्ने यासाठी महामंडळाची बस भाडे तत्वावर घेऊन जात. यालाच प्रासंगिक करार म्हणतात. अलीकडे खाजगी बस कंपन्यांनी वाहतूक क्षेत्रात कमालीची आगेकूच केल्यामुळे महामंडळच्या बस चे उत्पन्न घटले. उत्पन्न वाढावे, यासाठी पुन्हा शैक्षणिक संस्था, अन्य संस्था यांना एस.टी. बस वापरण्याचे आवाहन करण्यात येईल.
एस टी महामहामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रासंगिक करारावर एस टी बसेस भाडे तत्वावर देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्थानिक पातळीवर आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आम्ही प्रत्येक आगारात त्यासाठी टीम करतोय.
शाळांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देतो. शिवाय, भांड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 12 वर्षाखालील मुलांना एका सीटवर तिघे जण असतील, म्हणजे बसमध्ये 66 विद्यार्थी असतील. तर एका सीटवर 12 वर्षा पुढील विद्यार्थी 55 असतील. आम्ही शाळांना आवाहन करतो की, सहलीसाठी खासगी बस न वापरता, महामंडळाच्या बस ला प्राधान्य द्यावे.