मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात इयत्ता दहावीचा निकाल ९८.४८ टक्के लागला आहे. एकूण २९६८ विद्यार्थी पैकी २९६३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील २९१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशी माहिती आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे समन्वयक सुनील वळसे पाटील यांनी दिली .
तसेच आंबेगाव तालुक्यात एकूण ५४ शाळांपैकी ३२ शाळाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक वळसे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळा खालीलप्रमाणे –
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर विद्यालय शिनोली, विद्या विकास मंदीर विद्यालय अवसरी बुद्रुक, श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी, नरसिंह विद्यालय रांजणी, संगमेश्वर विद्यालय पारगाव, संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय चास, शासकीय आश्रम शाळा गोहे बुद्रुक, श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे, जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालय चिंचोली, श्री नवखंड माध्यमिक विद्यालय पारगाव, हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक , शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय लांडेवाडी, भैरवनाथ विद्यालय गिरवली, सहकार महर्षी डी.जी वळसे पाटील विद्यालय आंबेगाव, कृष्णा यशवंत भालचिम विद्यालय माळीन, न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी, डॉ. मुमताज अहमद खान उर्दू विद्यालय मंचर, श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे, माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल बोरघर, माध्यमिक विद्यालय खडकवाडी, कालभैरवनाथ लक्ष्मीबाई बांगर विद्यालय खडकी, हिरकणी विद्यालय गावडेवाडी, शासकीय आश्रम शाळा आसाने, वानेश्वर विद्यालय तिरपाड, प्रगती विद्यालय वडगावपिर, न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव, श्री एन एम नंदकर आदिवासी आश्रम फुलवडे, न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव, अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यालय पेठ, शासकीय इंग्लिश मीडियम स्कूल आश्रम शाळा .
तालुक्यातील शाळांचा टक्केवारीनुसार निकाल खालीलप्रमाणे –
महात्मा गांधी विद्यालय मंचर ९८.९६ टक्के, जनता विद्या मंदिर घोडेगाव ९५.८६ टक्के, हुतात्मा बाबू गेनू विद्यालय महाळुंगे पडवळ ९७.८७ टक्के, श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द ९७.८७ टक्के, शिवाजी विद्यालय धामणी ९३.७५ टक्के, श्री भैरवनाथ विद्यालय लोणी ८६.८४ टक्के, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर ९८.८० टक्के, श्री वाकेश्वर विद्यालय पेठ ९९.०९ टक्के, श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी ९८.९८ टक्के, शिवशंकर विद्यालय आंबेगाव ९६ टक्के, कमलजादेवी विद्यालय कळंब ९६.०३ टक्के, शासकीय आश्रम शाळा तेरुंगन ९७.२२ टक्के, श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी ९७.०५ टक्के, सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय भावडी ९६.२९ टक्के, श्री हरिचंद्र सिताराम तोत्रे विद्यालय कुरवंडी ८५.७१ टक्के, लालबहादूर शास्त्री विद्यालय आमोंडी ९३.५४ टक्के, श्रीरंग व्ही. गभाले विद्यालय मोहरेवाडी ९२.८५ टक्के, शरदचंद्र पवार विद्यालय डिभे ९४.११ टक्के, आदर्श विद्यालय जारकरवाडी ९३.१० टक्के, यशवंतराव चव्हाण विद्यालय आंबेगाव वसाहत ९६.९६ टक्के, शासकीय आश्रम शाळा राजपूर ९७.६१ टक्के, शासकीय आश्रम शाळा आहुपे ९७.२२ टक्के याप्रमाणे लागला आहे. अशी माहिती आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद बोंबले यांनी दिली.
मंचर येथे संगणक केद्रावर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती . विद्यार्थ्यांना निकालाच्या संगणकाची प्रिंट मोफत देण्यात आल्याची माहिती ओम कॉम्प्युटरचे संचालक प्रदीप लोंढे आणि अरुणा लोंढे यांनी दिली .