मंचर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत मतदारना प्रशिक्षण देणे आणि मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी आंबेगाव तहसील निवडणूक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १२) ते मंगळवार (दि. २) पर्यंत विविध गावांमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅड जनजागृती शिबिर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मंचर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली .
या व्हीएएममध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सुविधा असून, यासोबत नेमून दिलेले मास्टर ट्रेनर असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावा, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने ही मतदान जनजागृती असल्याने नवमतदार आणि विशेषः महिला मतदार यांनी विशेष सहभाग घ्यावा, असे आवाहन याप्रमाणे असून मतदारांनी जनजागृती शिबिरात सहभागी व्हावे, असे नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी केले.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅड जनजागृती वेळापत्रक
शिनोली बाजारतळ मंगळवार (दि. १२), अडिवरे बाजारतळ बुधवार (दि. १३), तळेघर बाजारतळ गुरुवार (दि. १४), डिंभे बाजारतळ शनिवार (दि. १६), घोडेगाव बाजारतळ शुक्रवार (दि. २२), घोडेगाव बस स्थानक सोमवार (दि. १), मंचर बाजारतळ शनिवार (दि. २३), पिंपळगाव तर्फे महाळुंगे बाजारतळ मंगळवार (दि. २), अवसरी बुद्रुक बाजारतळ गुरुवार (दि. २८), शिंगवे बाजारतळ सोमवार (दि. १८), रांजणी बाजारतळ गुरुवार (दि. २१), कळंब बाजारतळ मंगळवार (दि. २६), पारगाव त. अवसरी बुद्रुक बाजारतळ शुक्रवार (दि. १५), लोणी बाजारतळ बुधवार (दि. २०), मंचर बाजारतळ शनिवार (दि. २३), मंचर बाजार समिती शुक्रवार (दि. २९), मंचर बस स्थानक शनिवार (दि. ३०).