श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात सध्या कडाक्याची थंडी पडली असून श्रीनगर शहरात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान उणे 6 अंश सेल्सियस इतके होते. शुक्रवारच्या तापमानापेक्षा हे तापमान 2.2 अंशांने घटले आहे.
शुक्रवारी रात्री श्रीनगराचे तापमान उणे 3.8 अंश सेल्सियस इतके होते. बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील आजचे तापमान उणे 8.5 सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. पेहलगाम या पर्यटन स्थळावरही इतकीच थंडी असून तेथील तापमान 8.3 अंश सेल्सियस इतके होते.
काश्मीर खोऱ्यातील अन्य ठिकाणचे तापमान पुढील प्रमाणे होते. कुपवाडा – उणे 6.1, काझीगंद- उणे 6, कोकेरनाग- उणे 5.1. या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील नळही गोठले असून त्यातून पाणी येणे बंद झाले आहे.