पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या 130 महिला पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडीचे पत्र दिले. महिलांच्या दैनदिन प्रश्नावर आक्रमकता दाखवून पक्ष मजबूत करावा पक्ष सोडून कोणी गेले तरी पक्ष्यात नवे महिला नेतृत्व निर्माण करून पक्ष पुढे नेऊ शकतो असा ठाम विश्वास या प्रसंगी राज ठाकरे यांनी व्यक्त केला
पुणे शहरातील आठ मतदारसंघात महिलांच्या नविन नेमणुका करण्यात आलेल्या असून शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्षा, शाखा अध्यक्षा या पदावर नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, जयश्री मारणे, सुरेखा मकवान यांच्यावर राज ठाकरे यांनी महिला संघटना वाढवण्याची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीची महाआरती केली यावेळी शहर अध्यक्षा वनिता वागसकर,जिल्हा अध्यक्षा सुशीला नेटके, उपशहर अध्यक्षाअस्मिता शिंदे पद्मिनी साठे जयश्री पाथरकर उपस्थित होत्या.