रामेश्वरम – श्रीलंकन नौदलाने 8 भारतीय मच्छिमारांना अटक केली. ते तामीळनाडूचे रहिवासी आहेत. संबंधित मच्छिमार मासेमारी करण्यासाठी त्यांच्या नौका घेऊन समुद्रात गेले. (Sri Lankan navy detains 8 fishermen from Tamil Nadu for crossing Maritime border) त्यांना सोमवारी रात्री श्रीलंकन नौदलाने पकडले. त्यांच्या नौकाही ताब्यात घेण्यात आल्या.
भारतीय मच्छिमारांनी आमच्या सागरी हद्दीत अवैध शिरकाव केल्याचा कांगावा श्रीलंकन नौदलाकडून करण्यात आला. मच्छिमारांच्या अटकेची तातडीने दखल घेऊन तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना पत्र पाठवले.
त्या पत्रातून मच्छिमारांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे साकडे स्टॅलिन यांनी घातले. तामीळनाडूतील आणखी 11 मच्छिमार आधीपासूनच श्रीलंकेच्या कैदेत आहेत, याची आठवणही स्टॅलिन यांनी करून दिली.