आळंदी – पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्याची जबरी चोरीची घटना सोमवारी सायंकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास नगरपरिषद चौकात घडली. याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नगरपरिषद चौकातील नंदन कापड दुकानाजवळील लोखंडी गेट समोरून घरी जात होती. त्यावेळी पॅशन प्रो दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका देऊन तोडून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.