मुंबई – अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित केली होती. आता रामनवमीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजयने सोशल मिडीआयवर ‘आस्क भोला’ नावाची मोहीम चालवली होती. त्यादरम्यान अनेकांनी अजयला प्रश्न विचारले.
‘दृश्यम-2’ नंतर अजय देवगणसोबत तब्बूची जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंगही फुल झाले आहे. यावरूनच एका चाहत्याने थेट अजय देवगनला तिकीट स्पॉन्सर करण्याची विनंती केली. अजयने त्यावर दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.
सर मंथ एंड सुरु आहे.. तिकीट स्पॉन्सर करा अशी विचारणा एका चाहत्याने अजयला ट्विटद्वारे केली. त्यावर अभिनेत्याने त्याला कडक रिप्ले दिला. ‘मेरा भी’ असे उत्तर अजयने चाहत्याला दिले. म्हणजेच माझा सुद्धा मंथ एंड सुरु असल्याचा सूतोवाच अजयने यावेळी केला. नेकऱ्यांना अजयचे हे उत्तर चांगलेच आवडले आहे. अनेकांनी अजयच्या हा हजरजबाबीपनाचे कौतुक देखील केले आहे.
यावेळी अभिनेत्याने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना खूपच मजेदार उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. अजय देवगणने या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच्या आणि तब्बू व्यतिरिक्त, चित्रपटात गजराज राव, दीपक डोबरियाल, विनीत कुमार, संजय मिश्रा यांसारखे दमदार कलाकार देखील आहेत.