हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांची कन्या मिकेला सध्या चर्चेत आहे. मिकेलाने आपले फिल्मी करिअर सुरू केले आहे. पण हिरोईन म्हणून नव्हे, तर चक्क पोर्न स्टार म्हणून तिने काम करायला सुरुवात केली आहे. मिकेलाने स्वतःच आपले पोर्न व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. मिकेला ही स्पिलबर्ग यांची दत्तक कन्या आहे.
अमेरिकेतल्या नॅशविल भागात राहणारी मिकेलाने आपला निर्णय आपल्या माता-पित्यांना कळवला आहे. त्यांना या निर्णयाचे दुःख झालेले नाही. उलट त्यांनी आपल्या कन्येला पाठिंबाच दिला आहे. आपल्या आई वडिलांवर आर्थिक भार पडू द्यायचा नाही. त्यासाठी स्वतःचे काही उत्पन्नाचे साधन असायला हवे, म्हणून आपण पोर्न स्टार बनायचे ठरवले असल्याचे मिकेलाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले.
स्पिलबर्ग हे हॉलिवूडचे सर्वात आघाडीचे दिग्दर्शक आणि स्क्रीप्ट रायटर देखील आहेत. त्यांची एकूण कमाई 3.1 अब्ज डॉलर इतकी आहे. टाईम मॅगझीनने त्यांना शताब्दीचे प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान दिले होते. “ज्युरासिक पार्क’, “जॉ’ “शिंडलर्स लीस्ट’, “सेव्हिंग प्रायव्हेट रायन’, “इंडियाना जोन्स’ आणि “लिंकन’सारख्या जगभर नावाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.