Hardik Pandya – हार्दिक पंड्या त्याच्या क्रिकेटमधील अष्टपैलू कौशल्यामुळे कायमच चाहत्यांच्या चर्चेत असतो. याशिवाय तो मैदानाबाहेर त्याच्या कुटुंबासोबत वेळे घालवणे नेहमीच पसंद करतो. सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो हे त्याच्या कुटुंबाबातील सदस्यांसोबतचे असतात. यामध्ये त्याची पत्नी नताशा, भाऊ कृणाल पंड्या आणि हार्दिकची वहिनी पंखुरी शर्मा यांच्यासोबत त्याचे फोटो असतात. दरम्यान हार्दिकची वहिनी पंखुरी शर्माने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर हार्दिकचा ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याअगोदरच एक फोटो पोस्ट करत त्याखाली एक खास संदेश लिहिला आहे.
कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्माने हार्दिक ( Hardik Pandya ) सोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याअगोदरचा आहे. पंखुरीने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, “प्रत्येक दौऱ्यावर जाण्यापूर्वीचे अनिवार्य फोटोसेशन”. त्याचबरोबर या पोस्टमध्ये निळ्या रंगाचे हार्ट इमोजी शेअर केले आहे. हा फोटो आणि पंखुरीची पोस्ट चाहत्यांना खूपच आवडली आहे. काही वेळातच या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरु झाला.
हार्दिक ( Hardik Pandya ) गेल्या काही दिवसांपासून क्रिकेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या फिटनेसमध्येही बरीच सुधारणा केली आहे. रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिकवर मोठी जबाबदारी असणार आहे. टी-२० विश्वचषकात तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.
View this post on Instagram
विश्वचषकातील आव्हानांना लक्षात घेऊन हार्दिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळवले आणि त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आगोदरच या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत उतरणार आहे.