आंबेगाव तालुक्यातील पारगाव – काठापूर येथील हॉटेल आरती (ऋषिकेश) फॅमिली गार्डन रेस्टॉरंट हे हॉटेल खवय्यांसाठी व नागरिकांसाठी एक मेजवानी ठरलेले आहे.
नवीन अष्टविनायक (शिरूर ते मंचर) रस्त्यावरील पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याजवळ 11 वर्षापूर्वी निवृत्तीशेठ तुकाराम पवळे व त्यांचे मेव्हणे सुभाषशेठ जयवंत हिंगे यांनी छोटे हॉटेल (ढाबा) सुरु केले. अल्पावधीत हे हॉटेल तालुक्यातील मांसाहारी खवय्यांचे आवडीचे हॉटेल बनले.
त्यानंतर त्यांनी वर्ष 2018 मध्ये 50 लाख रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचे आकर्षक हॉटेल आरती नावाने फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बांधण्यात आले. या हॉटेलमध्ये मांसाहारी व शाकाहारी ग्राहकांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू केली. तसेच ग्राहकांना पार्टीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. हॉटेलसमोर फुलांनी सजलेली आकर्षक गार्डन असून आकर्षक विद्युत रोषणाई असून येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांकडे निवृत्ती पवळे व सुभाष हिंगे वैयक्तिक लक्ष देतात.त्यांची आपुलकीने विचारपूस करतात.
हॉटेल आरती रेस्टॉरंटमध्ये खेड, जुन्नर, पारनेर, शिरुर, आदी तालुक्यातून ग्राहक येतात. हॉटेलमध्ये विविध प्रकारचे मासे असलेली फिश थाळी मिळते. तसेच मटण थाळी, चिकन थाळी आणि स्पेशल मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी व तंदूर अशा अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. ग्राहकांना घरगुती पद्धतीचे जेवणही मिळते. इथल्या सर्वच पदार्थांची चव जिभेवर राहत असल्याने हॉटेल आरती रेस्टॉरंट हे उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण झाले असल्याने खवय्यांनी आपल्या फॅमिली व मित्रांसमावेत या हॉटेलला भेट दिलीच पाहिजे.
अशी आहेत वैशिष्ट्ये
1. अगदी माफक दर, अंर्तगत स्वच्छता, प्रसन्न वातावरण.
2. मुबलक कर्मचारी, तत्पर सेवा, स्वादिष्ट रुचकर पदार्थ
3. चिकन तंदुर व बिर्याणी खाण्यासाठी दूरवरून खवय्ये येतात.
या पदार्थांची चव निराळीच
खास बोल्हाईचे मटन,
गावरान तयार केलेली स्पेशल चिकन व मटन थाळी
मटन फ्राय
फिश थाळी
सोबतीला खास भाकरी
संकलन: लक्ष्मण ढोबळे
पारगाव शिंगवे