पुणे – बॅंक ऑफ महाराष्टृतर्फे बॅंकेच्या देशभरातील सर्व शाखा व विभागीय कार्यालयांत महाग्राहक परिचर्चा हा ग्राहक सभा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बॅंक ऑफ महाराष्ट्र आपल्या 1999 शाखा व 40 विभागीय कार्यालयांच्या मार्फत ग्राहकांच्या पर्यंत पोहोचण्याचा व त्यांच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा व ए बी विजयकुमार हे अनुक्रमे पुणे व मुंबई येथे झालेल्या ग्राहक सभांमध्ये उपस्थित होते. पुणे शहर व दक्षिण मुंबई विभागीय कार्यालयात झालेल्या या महाग्राहक परिचर्चेत पुणे व मुंबई शहराच्या पोलीस अधीक्षक अनुक्रमे पल्लवी रवींद्र बर्गे व वाहतूक पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके ठाकरे हे परिचर्चेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हात्या.
बॅंकेचे सरव्यवस्थापक व्ही डी कोल्हटकर, संजय रूद्र व मनोज करे हे देखील अनुक्रमे पुणे शहर व दक्षिण मुंबई विभागीय कार्यालयातून उपस्थित होते.