पुणे – गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जागतिक दर्जाचे सर्वांगीण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या हस्ते बेस्ट एज्युकेशनिस्ट आयकॉनिक अवॉर्ड-2021 प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या समारंभात वर्ल्ड बिझनेस रिव्ह्यू कॉर्पोरेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षण देण्याची सूर्यदत्ताची परंपरा यापुढेही कायम राहील.
येत्या काळात महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभर विस्तार करण्याचा मानस आहे. डिजिटल माध्यमांमुळे जग जवळ आले असून, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी या माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. वैविध्यपूर्ण शाखांचे शिक्षण सूर्यदत्तामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.