पुणे – पीएमपी ताफ्यातील स्पेअरपार्ट अभावी बंद राहणाऱ्या बसला आता स्पेअरपार्ट उपलब्ध होणार आहेत. यासाठी संबंधित कंपनीने पीएमपीच्या मध्यवर्ती कार्यालयात काउंटर सुरू केले आहे. यामुळे संचलनातील बसेसची संख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ताफ्यात सद्यस्थितीत 1,800 बस आहेत. यामधील संबंधित कंपनीच्या बसची संख्या लक्षणीय आहे. ताफ्यात गेल्यावर्षी 200 मिडी बस दाखल झाल्या होत्या. या बसेसचे अनेक स्पेअरपार्ट बाजारामध्ये उपलब्ध होत नाहीत. परिणामी, स्पेअरपार्टअभावी अनेक बस डेपोमध्ये बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलेली होती. तसेच, इतर काही बसेसचे सुट्ट्या भागांबाबतही अडचण येत होती.