माद्रिद – चीननंतर कोरोनाचा धोका जगभर वाढत आहे, त्यातच स्पेन व इटलीत भयावह परिस्थिती आहे. यातच आता क्रीडापटूंनाही करोनाची लागण झाल्याचे समोर येत असून स्पेनच्या फुटबॉल संघातील अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
व्हेलेंसिया फुटबॉल क्लबच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. केवळ फुटबॉलपटूच नव्हे तर स्पेनच्या सुमारे 7 ते 8 हजार नागरिकांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
जेव्हा देशात करोनाचे रुग्ण आढळले तेव्हाच व्हेलेंसिया क्लबने प्रशिक्षक, कर्मचारी व खेळाडू यांची चाचणी घेतली होता, त्याचा अहवाल आला असून अनेकांना करोनाने ग्रासल्याचे उघड झाले आहे. या सगळ्यांना एका रुग्णालयात निगराणीखाली विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.