पुणे : एनपी-एव्ही आयोजित पहिल्या एनपी-एव्ही आंतर आयटी क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत क्रेडिट सुईस, आयडियाज, इन्फोसिस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
व्हेरॉक क्रिकेट मैदान, व्हिजन क्रिकेट मैदान, लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे पार पडलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात प्रवीण कुलकर्णी (2-9) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर क्रेडिट सुईस संघाने सिनर्जीप संघाचा 7 गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात चारू म्हात्रे (नाबाद 84 धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर
आयडियाज संघाने मास्टरकार्डचा 7गडी राखून पराभव करत धडाकेबाज फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना मंदार नायर 36, इमाम जाफर 34, अमित भगत 23 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर मास्टर कार्ड संघाने 20 षटकात 8 बाद 136 धावा केल्या. याच्या उत्तरात आयडियाज संघाने हे आव्हान 14.5 षटकात 3 बाद 137 धावा करून पूर्ण केले.
यामध्ये चारू म्हात्रे याने 51 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 84 धावा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. चारुला परेश दहिवळने 26 धावा काढून सुरेख साथ दिली. तिसऱ्या सामन्यात साईनाथ शिंदे (74 धावा) याने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने ऍमडॉक्सचा 38 धावांनी पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – साखळी फेरी – सिनर्जीप – 18.5 षटकात सर्वबाद 85 धावा (आकाश बिहाडे 29, दीपेश 26, प्रवीण कुलकर्णी 2-9, सुनील कुंभार 2-14, बादल तांबोळी 2-12) पराभूत वि. क्रेडिट सुईस – 10.3 षटकात 3 बाद 86 धावा (सुमित फोफाटे 22, भानू धीर 36, प्रसाद नागमनी 2-12); सामनावीर – प्रवीण कुलकर्णी;
मास्टर कार्ड – 20 षटकात 8 बाद 136 धावा (मंदार नायर 36, इमाम जाफर 34, अमित भगत 23, रिषभ शुक्ला 3ृ-18, परेश दहिवळ 2-19) पराभूत वि. आयडियाज – 14.5 षटकात 3 बाद 137 धावा (चारू म्हात्रे नाबाद 84, परेश दहिवळ 26, मंदार नायर 2-25); सामनावीर – चारू म्हात्रे;
इन्फोसिस – 20 षटकात 5 बाद 167 धावा (मकरंद ढमाले 50, साईनाथ शिंदे 74, हर्षद खटावकर 2-20, मितेश मयेकर 2-37) वि. वि. ऍमडॉक्स – 20 षटकात 7 बाद 129 धावा (विजय कुमार 51, प्रकाश कुंता 22, निमिश रघुवंशी 2-28, सूरज गुप्ता 2-24, अश्लेष चौधरी 2-17); सामनावीर – साईनाथ शिंदे.