मुंबई – ‘कब्जा’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामुळे चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढली आहे. साऊथ स्टार किच्चा सुदीप आणि उपेंद्र स्टारर हा चित्रपट गँगस्टरची कहाणी आहे. आर चंदू दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित यांनी केली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.’अंडरवर्ल्ड का कब्जा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची फॅन्समध्ये चांगलीच चर्चा होती. आनंद पंडित यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब अकाउंटवरून ट्रेलर प्रदर्शित केला. २.५४ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांना KGF चित्रपटाची आठवण झाली असल्याचे सोशल मीडियावरील पोस्ट पाहून समजते.
हा चित्रपट 17 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात किच्चा सुदीप आणि उपेंद्र यांच्याशिवाय शिव राजकुमार, श्रिया शरण, मुरुली शर्मा, कोटा श्रीनिवास राव, नवाब शाह आणि कबीर सिंह हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
T 4574 – Happy to present to you .. the trailer of “Underworld Ka Kabzaa” .. a film produced by my dear friend @anandpandit63 and directed by @rchandru_movies ..
All the best to @nimmaupendra, @NimmaShivanna, @KicchaSudeep & @shriya1109https://t.co/8szKCvvKvf#KabzaaTrailer
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 4, 2023
या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर सुपरस्टार बिग बी यांनी शेअर केला आहे. यावेळी बिग बींनी लिहिले, ‘माझ्या प्रिय मित्राने निर्मित केलेल्या ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’चा ट्रेलर तुमच्यासमोर सादर करताना आनंद होत आहे.’ यासोबतच बिग बींनी चित्रपटाच्या स्टारकास्टला शुभेच्छाही दिल्या.