पुणे – टोरंट कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या ‘सीएनजी’चे भाव आणखी प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पुण्यात वाहनचालकांना प्रतिकिलो “सीएनजी’साठी 94 रुपये मोजावे लागणार आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे आधीच मोडले असताना सीएनजीचे दर वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.
महागाई काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या स्थिर असतानाच सीएनजीच्या किंमती वाढताना दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.
2022 मध्ये “सीएनजी’च्या दरात तब्बल तीस रुपयांनी वाढ झाली होती. यावर्षी सुरुवातीचे दोन महिने सीएनजीचे दर वाढले नव्हते; मात्र मार्चच्या पहिल्याच आठवड्यात हे भाव वाढले आहेत. पेट्रोल आणि डीझेलचे भाव मागील काही महिन्यांपासून स्थिर असले, तरी ‘सीएनजी’चे भाव सतत वाढत आहेत.