मुंबई – अमिताभ बच्चन गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. बिग बींना मंदिरात जाताना पाहून चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी सुरक्षेसाठी पोलिसही त्यांच्या आजूबाजूला होते. अनवाणी अमिताभ बच्चन यांनी मंदिराची प्रदक्षिणा केली आणि नंतर मंदिरात प्रवेश केला. अमिताभ बच्चन कुर्ता पायजमा आणि शाल अशा एकदम सध्या वेशामध्ये दिसले.
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ चित्रपट 18 ऑगस्टला रिलीज होत आहे. मुलगा अभिषेकच्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी बिग बी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि गणपतीचे दर्शन घेतल्याचे समजते. या वेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता मंदिरात प्रवेश करताना आणि कडक पोलीस बंदोबस्तात नतमस्तक होताना दिसत आहे. सध्या अमिताभ हे त्याच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या 15 सिजनमुळे देखील चर्चेत आहे.त्यांचा हा शो टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक टीआरपी असणारा शो आहे.
अभिषेक बच्चनच्या घुमरची जोरदार चर्चा
अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेक क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘घूमर’ चित्रपटात अमिताभ बच्चन छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. टीव्हीचा लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती 15’ अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. यंदाच्या बिग बींच्या या शोमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याच बोललं जात आहे.