South Movie : ‘लिओ’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहणाऱ्या थलपथी विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. विजय, संजय दत्त आणि अर्जुन सर्जा स्टारर लिओ या चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर आज 5 ऑक्टोबरला रिलीज झाला.
अभिनेता थलपथी विजयचा आगामी चित्रपट ‘लिओ’चा ट्रेलर व्हिडिओ जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे. यात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो प्रदर्शित होताच इंटरनेटवर लोकप्रिय झाला. यामध्ये दोन सुपरस्टार एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. हा चित्रपट 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विक्रम आणि मास्टर सारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी लिओ बनवला आहे. लोकेशच्या करिअरमधील लिओ हा सहावा चित्रपट आहे, ज्याने 2016 साली चित्रपट दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. याआधी त्याने ‘कैदी’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले आहेत.
सुपरस्टार विजय स्टारर चित्रपट लिओ हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, जो लोकेश कनागराज यांनी खूप मेहनत करून बनवला आहे. लोकेश मास्टर आणि विक्रम या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यांनी कैदी, मंगराम आणि अवियाल सारखे हिट चित्रपटही दिले आहेत.
विजयसोबत या चित्रपटात बॉलिवूड स्टार संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन सर्जा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे. याशिवाय गौतम मेनन, मिस्किनस, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात साईड रोलमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अनुराग कश्यपचा कॅमिओ दिसणार आहे. जवानचे संगीतकार अनिरुद्ध यांनी चित्रपटात संगीत दिले आहे. मनोज परमहंस यांनी सिनेमॅटोग्राफी केली आणि फिलोमिन राज यांनी चित्रपटाचे संपादन केले. चित्रपटाचे निर्माते सेव्हन स्क्रीन स्टुडिओ आहे.
अभिनेता थलपथी विजयचा आगामी चित्रपट ‘लिओ’चा ट्रेलर व्हिडिओ रिलीज झाला आहे. त्याचा व्हिडिओ जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे. यात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो प्रदर्शित होताच इंटरनेटवर लोकप्रिय झाला. यामध्ये दोन सुपरस्टार एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. हा चित्रपट 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.