मुंबई – मराठमोळा संगीतकार अवधूत गुप्तेची (Avadhoot Gupte) तरुण वर्गात खूप क्रेझ पाहायला मिळते. त्याची दमदार गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. मात्र सध्या अवधूत गुप्ते त्याच्या गाण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. अवधूतचे एक छोटे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्याने म्हंटले आहे. नुकतेच त्याने इनस्टाग्रामवर सुंदर व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे.
अवधूतची पोस्ट-
‘दरवर्षी धरण भरलं की पाणी गळाभेट घ्यायला आल्यासारखं डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि मी सुद्धा पाय बुचकळून तासनतास बसायचो! दरवर्षी मनात यायचं की ह्यापेक्षा जास्त जवळ जायला हवं त्याच्या.. पण त्यासाठी स्वतःची बोट हसायला हवी. मनात आलं, की टाकली पाण्यात आणि सुरुवात केली वल्हवायला! मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं..झालं!! त्यातलं हे एक पूर्ण केलं!!! ते सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब सारख्या मित्रांच्या साथीनं..’
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्तेसोबत त्याचा मित्र स्वप्नील बांदोडकर देखील दिसत आहे. हे दोघे यावेळी जहाजात बसलेले दिसत आहे. यात स्वप्नील बांदोडकर बोट वल्हवताना दिसतो तर अवधूत पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहे. भोरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. पावसामधील या निसर्गरम्य वातावरणात अवधूत पूर्णपणे हरवून गेल्याचे दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे.