पार्ल (द.आफ्रिका) : हेनरिक क्लासेनच्या दमदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हेनरिक क्लासेन सामन्याचा मानकरी ठरला.
🇿🇦 Bag the first win of the series
Great performance from the boys to seal a 7⃣4⃣ run victory over🇦🇺
Klaasen crucial 💯ensures 🇿🇦 post a competitive total
Ngidi the pick of bowler 3⃣ wickets
Verreynne had an incredible with 3⃣ catches
We love it #ProteaFire
#SAvAUS pic.twitter.com/t1NRBqvURW
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 29, 2020
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या २९१ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा डाव ४५.१ षटकांत २१७ धावसंख्येवर संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाकडून फलंदाजीत स्टीव स्मिथने ७६(९४), मार्नस लबुशेनने ४१(५१), डेविड वाॅर्नरने २५(२७), डार्सी शाॅर्टने १८(२४) आणि मिचेल मार्शने १६(१९) धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३, ऐनरिक नाॅर्टजे आणि तबरेज शम्सीने प्रत्येकी २, तर एंडिल फेहुलकवायेने १ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनच्या नाबाद १२३(११४), डेविड मिलरच्या ६४(७०), काइल वेरेयेनेच्या ४८(६४) आणि टेम्बा बमुमाच्या २६(३०) धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २९१ अशी मजल मारली होती. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत पॅट कमिन्सने ३, मिशेल स्टार्कने २ तर जोश हेजलवुडने १ गडी बाद केला.