Amala Paul : दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. 5 नोव्हेंबर रोजी तिने बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी विवाह केला. केरळमधील ग्रँड हयात कोची बोलगट्टी येथे मोठ्या थाटामाटात तिचा विवाह पार पडला. अमालाने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
लग्नासाठी अमाला आणि जगत लॅव्हेंडर रंगाच्या पोशाखाची निवड केली होती. दोघेही या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. लग्नातील काही सुंदर क्षणांचे फोटो शेअर करत “अमालाचे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रेम आणि कृपेचा उत्सव साजरा करत आहोत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद शोधत आहोत’,” असं कॅप्शन फोटोबरोबर अमालाने दिले आहे. या पोस्टनंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील तूफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
जगत गोव्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. काही आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल माहिती दिली होती. यापूर्वी अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 2014 मध्ये या लग्न केल्यानंतर काही कारणांमुळे 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. मात्र आता पुन्हा एकदा अमलाने नव्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे.