मुंबई – अभिनय, गायक आणि परफॉर्मर असा विविधांगी भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘सोफी चौधरी’ ही आपल्या हेल्थ आणि फिटनेसबाबत खूपच जागृक असते. सोफी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, नुकतंच अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे इंस्टाग्रामवर काही बोल्ड लुक मधील फोटो शेअर केले असून, तिचा बोल्ड अंदाज फॅन्सला खूप आवडला आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी उभी असून स्काई ब्लू बिकिनी तिने घातली आहे.
स्काई ब्लू बिकिनीमध्ये सोफी प्रचंड मादक दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोंमध्ये, सोफी चौधरीने तिचे केस उघडे ठेवले आहेत आणि गॉगल लावला आहे. या फोटोंमध्ये सोफी चौधरी वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या स्टाइलमध्ये पोज देतांना दिसत आहे.
अनेक म्युझिक व्हिडिओंशिवाय सोफी चौधरीने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोशल मीडियावर सोफी चौधरीचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या या हॉट फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात.