परळी | संत सोपानकाका मंदिर अतिक्रमण प्रश्न चिघळला, वारकऱ्यात संताप; मंत्री धनंजय मुंडे यांच्या दरबारात वारकऱ्यांना न्यायाची अपेक्षा

परळी – येथील संत जगमित्र नागा मंदिरच्या बाजूस असलेल्या संत सोपान काका मंदिरच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण धारकांकडून येथील वारकऱ्यांना जाणून बुजून त्रास दिला जात आहे. या बाबतचा तिडा सोडवण्याचा प्रयत्न गटनेते वाल्मीक आन्ना कराड यांनी केला होता.

परंतु हे प्रकरण अधिकच चिघळले असून आता वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न आपल्या दरबारात सोडवण्याचे आश्वासन वारकरी संप्रदायाला दिले आहे. त्यामुळे आता शुक्रवारी मंत्री धनंजय मुंडे अतिक्रमणधारकांना न्याय देतात की वारकरी संप्रदायाला. याकडे आता संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की संत सोपान काका मंदिरच्या बाजूस जबदे यांची जागा होती. त्या जागेवर प्लॉट्स काढून जब्देनी केवळ शंभर रुपयाच्या बॉण्ड वर लिहून दिले असल्याचे समजते, परंतु त्या फ्लॅटधारकांना दिलेला रस्ता हा प्रभात टाकीच्या आतून दिला असल्याचे नकाशावर निष्पन्न आहे. परंतु जबदे यांनी सदर रस्ता हा दुसऱ्या बाजूने काढून दिल्याने हे प्लॉट धारक संत सोपान काका मंदिरच्या जागेमध्ये अतिक्रमण झाले आहे.

थोडे नाही तर चक्क पंधरा ते वीस फूट जागा अतिक्रमीत केली आहे. विशेष म्हणजे संत सोपान काका मंदिरच्या वतीने याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने अतिक्रमण करणाऱ्याना बांधकाम करण्याचा मज्जाव केला असतानाही यांनी बांधकाम करून घेतले तर येथील रजिस्ट्री ऑफिस यांनी खोट्या रजिस्ट्री  करून दिल्या असल्याचेही सांगितले जात आहे. तर नगरपालिका प्रशासनानेही विरोध केला असतानाही यांची नावे लावली आहेत.

मंदिरच्या बाजूने सर्व कागदपत्रे सत्य असतानाही अतिक्रमण  धारक काही गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे या गरीब वारकरी संप्रदायावर दबाव टाकून दारू पिणारी मंडळी गोळा करून  शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याची हि अनेक तक्रारी मंदिर व्यवस्थापकांनी पोलिस प्रशासनाला वेळोवेळी दिली आहे. तर नगरपालिकेचे अधिकारी मात्र चोपडेपणा करून चपट्या- बोठ्या देणाऱ्या गुंडांन सहकार्य करत असल्याचेही दिसत आहे.

विशेष म्हणजे संत सोपान काका मंदिर म्हणजे परळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे गुरू घराणे आहे. त्यामुळे आज न.प. प्रशासन पाच-पन्नास मतदानासाठी अतिक्रमित लोकांना सहकार्य करत असले तरी तालुक्यातील हजारो मतदार असलेले वारकरी संप्रदाय मात्र संताप व्यक्त करत आहेत, आणि हा प्रश्न योग्यरीतीने  सोडवला  नाही तर याचा परिणाम राजकीय पुढाऱ्यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे शेकडो वारकरी संप्रदाय अतिक्रमण उठविण्यासाठी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु गरीब वारकरी संप्रदाया आहे त्यामुळे अतिक्रमणधारकांना पुढे कमी पडत असल्यामुळे वाल्मीक आन्ना कराड मोठ्या अडचणीत आल्याचे दिसत आहेत आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात गेले असता याबाबत वाल्मीक आन्ना कराड यांच्याशी चर्चा केली.

परंतु हा प्रश्न सुटणार नाही असा विश्वास वाटल्यानंतर चक्क संत भगवान बाबा मठाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोबाईल द्वारे संभाषण करून मंदिरावर झालेल्या अतिक्रमणाची सविस्तर माहिती दिल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आपण स्वतः शुक्रवारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे अतिक्रमण धारक 50 मतदारांच्या बाजूने न्याय देणार की मतदारसंघातील हजारो वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सोपान काका मंदिरच्या बाजूने न्याय देणार याकडे आता संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.