बीड – भरधाव स्वीफ्ट डिझायर गाडी बाभळीच्या झाडावर आदळून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान परळी रोडवरील तेलगाव येथे घडली. युनुस शेख आणि सचिन मोकमपल्ले यांचा अपघात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अमोल वाघमारे असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील युनुस, सचिन आणि अमोल हे तिघेजण भोकर येथून बीडला जात होते. यावेळी परळी रोडवरील तेलगाव येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीची बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीतील मृतांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.