मुंबई – देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात म्हणाले. आता त्यांचा या विधानावरून राजकारण तापले आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांची थेट औरंगजेबाशीच तुलना करणारं ट्वीट केलं आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ दरम्यान या ट्विटवरून राजकारण तापले आहे.
तर देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे या विधानावरून वाद निर्माण झाल्यावर शरद पवारांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण दिलं आहे. शरद म्हणाले,“ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा?” असं पवार म्हणाले.