मुंबई – अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केल्याने लोकांच्या हृदयात स्वतसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच सामाजिक कार्य करणाऱ्या सोनूला अनेकजण रियल हिरो मानतात. सोनू आपल्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो,नुकतंच सोनुने सोशल मीडियावरून एका महिलेला थेट गाण्यासाठीची ऑफर दिली आहे. सोनूने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. घर काम करता करता ही महिला ”मेरे नैना सावन भादों’ हे गाणं गातां दिसते. नेटकर्त्यांना या महिलेचा आवाज चांगलाच आवडलाय. अनेकांनी तिच्या आवाजाचे कौतुक देखील केले आहे.
नंबर भेजिए
माँ फ़िल्म के लिए गाना गाएगी ❤️ https://t.co/rLebxFRhWX— sonu sood (@SonuSood) January 27, 2023
महिलेच्या या सुंदर गाण्याचा व्हिडीओ रिट्विट करत सोनू सुदने “नंबर पाठवा.. आता माताजी चित्रपटासाठी गाणं म्हणणार” असं म्हंटल आहे. सोनुने गाणं ऐकता क्षणी महिलेला चित्रपट गाण्याची ऑफर दिल्याने त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. नेटकऱ्यांनी आता या दोघांचे देखील कौतुक करायला सुरुवात केली आहे.