मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
दोन दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पण गेल्या महिन्याभरापासून या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गॅंगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिसून आलं आहे. त्यामुळं आता ट्विटरवर #BoycottGang हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. मात्र, अश्यातच आता सोशल मीडियावर आणखी एक ट्विट चांगलाच चर्चेत आलं आहे.
Gattaca movie “I never saved anything for the swim back” I think life is a bit like that….You aren’t meant to plan your return…U r meant to move forward. Don’t come back…try to finish what u started. Just a 57yr olds’ advice things.
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 27, 2023
हे ‘पठाण’ चित्रपटातील मुख्य अभिनेता शाहरुख खान याचे असून, यामधून अभिनेत्यानं यशस्वी होण्यासाठी खास टीप दिली आहे. शाहरुखने 1997 साली प्रदर्शित झालेल्या Gattaca चित्रपटातील डायलॉग ट्वीट केला. त्याने लिहिलं, “Gattaca चित्रपट – ‘मी परत येण्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. मला वाटतं आयुष्यही असंच असतं… तुमचं पुनरागमन तुम्हाला ठरवण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. मागे परतू नका, प्रयत्न करत रहा आणि जे सुरू केलंय ते संपवा.” असं शाहरुख म्हणाला आहे. सध्या हे ट्विट चांगलाच व्हायरल होत असून, नेटकाऱ्यानी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.