सोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाचे कर्नाटकातील नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी उपस्थित होत्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही सोमवारी तिहारमध्ये शिवकुमार यांची भेट घेतली होती.

दरम्यान, शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी या भेटीविषयी माहिती दिली. ‘सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे शिवकुमार यांना सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र
आहे. अशाच प्रकारे इतर नेत्यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. आम्हाला यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधावाच लागेल,’ असे सुरेश यांनी म्हटले आहे.

शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्ती प्रकरणी ३ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज अद्याप न्यायालयात प्रलंबित असून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.