मुंबई – अभिनेत्री सोनम कपूरने यूके इंडिया वीक सेलिब्रेशनसाठी 10 डाउनिंग स्ट्रीट येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हटके लुक केला होता. यामुळे अनेकांचे तिने लक्ष वेधून घेतले होते. सोनमने भारताचे प्रतिनिधित्व करत सुंदर साडी परिधान केली होती.
इंस्टाग्रामवर सोनमने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर फुलांची प्रिंट आहे. त्यावर तिने मोठे जॅकेटही परीधान केले आहे. सध्या तिच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘यूके इंडिया वीक साजरा करण्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीट येथे रिसेप्शनसाठी रोहितबालॉफिशियलचे प्रतिनिधित्व करत आहे. लंडनच्या उन्हाळ्यात मला साडी नेसायला मिळाले हे किती सुंदर दिवस आणि किती आनंद झाला.’
सध्या सोनमचा हा वेस्टर्न लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तिच्या या फोटोवर सोनमचा पती आनंद आहुजाने हृदय-डोळ्यांच्या इमोजीसह ‘वाइल्ड’ प्रतिक्रिया दिली. याशिवाय मलायका अरोरा, समंथा रुथ प्रभू, अर्जुन कपूरपासून ते भूमी पेडणेकरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, हे रिसेप्शन यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. 26 ते 30 जून दरम्यान लंडन येथे होणार्या इंडिया ग्लोबल फोरमचा प्रमुख कार्यक्रम हा यूके-इंडिया वीकचा एक भाग आहे. राजकारण, व्यवसायासह महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम केला जातो. नुकताच सोनमच्या कमबॅक चित्रपट ‘ब्लाइंड’चा टीझर प्रदर्शित झाला. यात सोनमने एका पोलिस महिलेची भूमिका केली आहे