मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिलेल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक खुलासे केले. यावेळी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल यावर त्यांनी आपल मत मांडलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच माझे बॉस आहे. त्यांना मी बॉस म्हणून स्वीकारले आहे.’ हे विधान आहे. फडणवीसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भूमिका मांडली. त्याचबरोबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल, याबद्दलही भाष्य केलं.
फडणवीस पुढे म्हणाले,’मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहे. आमच्यात कोणताही बदल झालेला नाही. सुरूवातीपासून आमचे संबंध चांगले आहेत. एकमेकांचा आदर, हेच त्यामागचे कारण आहे. शिंदे माझ्यासोबत मंत्री होते. पण आम्ही आमच्या व्यवहारात दिसू देत नाही. आता ते माझे बॉस आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे नेते आहेत आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि शिंदे हे त्यांच्या व्यवहारातून कधीही बॉस असल्याचे जाणवू देत नाही. एक जाहिरात आमचे संबंध बिघडवू शकत नाही.” असं म्हणत फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे.