जगात असे अनेक देश आहेत, जिथे खाण्याचे पदार्थ इतके विचित्र आहेत की ते पाहून कुणालाही किळस येऊ शकते. पण काही फूडीजला विचित्र डिश खायला आवडतात. जगातील असे अनेक ठिकाण आहे जिथे अजब गजब डिश बनविल्या जातात. अशाच एका डिशचा फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.
हा फोटो तैवानमधील रेस्टॉरंटमधला आहे. येथील विचित्र डिशसोशल मीडियावर चर्चेत आहे. हे रेस्टॉरंट लोकांना नूडल्ससह मगरीचे संपूर्ण पाय देत आहे. या डिशमध्ये मगरीचा पाय हे मुख्य आकर्षण आहे. ऐकून भयानक वाटतंय पण ही अनेक लोक आवडीनं खातात.
तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, Nu Wu Mao Kuei नावाचे हे रेस्टॉरंट युनलिन काउंटीच्या डौलिउ शहरात आहे, ज्याने नुकतेच गोडझिला रामेन नावाचा एक विचित्र पदार्थ लाँच केला आहे. ‘क्रोकोडाइल्स फूट’ हा यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. रेस्टॉरंटचा दावा आहे की त्यांनी ही स्वादिष्ट डिश बनवण्यासाठी 40 हून अधिक मसाल्यांचा वापर केला आहे.
रेस्टॉरंटने आपल्या फेसबुक पेजवर गॉडझिला रामेन लॉन्च करण्याची घोषणा केली. यामध्ये मगरीचा पाय वाफवून शिजवला जातो. व्हायरल क्लिपमध्ये तुम्हाला एक महिला ग्राहक मजा घेताना दिसत आहे. डिश चाखल्यानंतर, स्त्री आश्चर्यकारकपणे स्वादिष्ट म्हणून वर्णन करते.
अतिशय विचित्र दिसणार्या या डिशची किंमत 48 डॉलर (म्हणजे सुमारे 4 हजार रुपये) आहे. मगरीचे पाय टायटुंगमधील एका फार्ममधून मिळत असल्याने, एका दिवसात फक्त दोन ग्राहकांना ते खाण्याची संधी मिळते. रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की ज्यांना त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांनी ऑनलाइन बुकिंग करावे.